विडणीत वाढतोय बाधितांचा आकडा

विडणी  – विडणी, ता. फलटण येथे करोनाचा प्रादुर्भाव वाढला असून आठवडाभरात अठरा जणांचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे खबरदारीची उपाययोजना म्हणून विडणी गावठाण बफर झोन घोषित करण्यात आला आहे.

विडणीमध्ये दिवसेंदिवस करोनाचा शिरकाव वाढत असून या आठवड्यात तब्बल अठरा जणांचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आल्याने गावामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून विडणी गावठाण बफर झोन करण्यात आले आहे.

तर दहाबिगे वस्तीवर एकाच कुटुंबातील 13 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने या ठिकाणचा परिसर ग्रामपंचायतीने बंद करून परिसरात कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीने खबरदारीची उपाययोजना म्हणून गावात विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली असून परिसरात जंतुनाशक फवारणी करण्यात येणार असल्याचे सरपंच रुपाली अभंग यांनी सांगितले.

दरम्यान, विडणी गावात होम टू होम सर्व्हे आशा वर्कसकडून करण्यात येत असून सर्दी, ताप, घसा आदी लक्षणे जाणवल्यास आरोग्य केंद्रास संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.