- 294 करोनामुक्त
- 112 बाधित
पिंपरी– पिंपरी चिंचवड शहरामध्ये नवीन बाधित रुग्णांपेक्षा करोनामुक्त रुग्णांची संख्या जास्त आहे. आज दिवसभरात 112 करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 294 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, आज शहरात 112 जणांना करोनाची लागण झाली. आजपर्यंत शहरातील 2 लाख 71 हजार 449 जणांना करोनाची लागण झाली आहे. आज दिवसभरात मागील दोन बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासात आणखी एका करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत शहरातील 4410 करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
आज दिवसभरामध्ये 294 रुग्ण बरे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 66 हजार 502 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 6810 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये तपासणीसाठी दाखल केले आहे. सद्यस्थितीत शहरातील महापालिकेची रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये 555 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 692 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 1427 इतकी आहे.