नवी दिल्ली – देशात रोज 90 हजारापेक्षा अधिक करोनाग्रस्त आढळून येत असून हा सिलसिला कालही कायम राहिला.
केंद्रीय आरोग्य विभागाने आज सकाळी आठ वाजता गेल्या चोवीस तासातील जे अपडेट्स दिले आहेत, त्यानुसार काल पुन्हा देशात 92 हजार 71 नवीन करोना रुग्ण आढळून आले आहेत.
त्यामुळे देशातील एकूण करोनाग्रस्तांची संख्या आता 48 लाख 46 हजारांवर गेली आहे. तर मृतांची संख्या 79 हजार 722 वर गेली आहे. मृत्यूंचा दर आणखी काही प्रमाणात घटला असून तो काल 1.64 टक्के इतका होता.
सध्या देशात करोनाच्या 9 लाख 86 हजार 598 ऍक्टिव्ह केसेस आहेत. आतापर्यंत 37 लाख 80 हजार 107 रुग्ण बरे झाले आहेत.