जगभरातील करोनाच्या मृत्यूंची संख्या 4 लाखांवर

मेरीलॅन्ड – जगभरात करोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येने आता 4 लाखांचा टप्पा पार केला आहे. तर करोनाबाधितांची संख्या 69 लाखांच्या पुढे गेली आहे. जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीने केलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत 4 लाख 135 जण आतापर्यंत करोनाच्या संसर्गामुळे मृत्युमुखी पडले आहेत.

करोनाबाधित आणि करोनाच्या संसर्गामुळे मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्येच्या क्रमवारीमध्ये अमेरिकेचा क्रमांक अजूनही सर्वात पहिला लागतो आहे. अमेरिकेत आतापर्यंत 19 लाख जणांना करोनाची बाधा झाली आहे, तर 1 लाख 9 हजार जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

ब्राझीलमध्ये 6 लाख 72 हजार जणांना करोनाची लागण झाली आहे. तर 35 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे रशिया आणि ब्रिटनमध्ये अनुक्रमे 6 लाख 67 हजार आणि 2 लाख 86 हजार जणांना करोनाची लागण झाली आहे. ब्रिटनमध्ये 40 हजार जणांना करोनाची बाधा झाली आहे. तर मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ब्रिटनमध्ये दुसऱ्या क्रमांकाइतकी आहे.

करोनाबाधितांच्या संख्येच्या क्रमवारीमध्ये भारताने स्पेन आणि इटलीला मागे टाकले आहे. एकूण 2 लाख 47 हजार रुग्णसंख्येमुळे जागतिक क्रमवारीमध्ये भारत आता पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.