लोणी काळभोर -हवेली तालुक्यात मंगळवारी (दि. 7) दिवसभरात करोनाचे 34 नवीन रुग्ण आढळून आले. मंगळवारी दिवसभरात आढळून आलेल्या 34 रुग्णांमुळे हवेलीमधील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 290वर पोचली आहे.
मंगळवारी दिवसभरात हवेली तालुक्यात आढळून आलेल्या 34 करोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी मांजरी बुद्रुक (दहा), देहु (नऊ), लोणी काळभोर (चार), कदमवाकवस्ती (दोन) या चार बड्या ग्रामपंचायत हद्दीत तब्बल 25 रुग्ण आढळून आले आहेत. उर्वरीत नऊ रुग्ण हे थेऊर (एक), खडकवासला (तीन), आगळंबे (एक), नांदेड (एक), कुंजीरवाडी (एक), उरुळी कांचन (दोन) अशा सहा ग्रामपंचायतीत आढळून आले.
पूर्व हवेलीमधील लोणी काळभोर, मांजरी बुद्रुक, उरुळी कांचन व कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत मागिल तीन दिवसांपासून करोनाचे रुग्ण वाढीचा वेग मंदावला होता. मात्र काल (सोमवार) पासून पॉझिटिव्ह रुग्णांचा वेग वाढला आहे. दोन दिवसांत उरुळी कांचन (6), मांजरी बुद्रुक (11), लोणी काळभोर (5), कदमवाकवस्ती (2) या चार ग्रामपंचायत हद्दीत तब्बल 24 रुग्ण आढळून आले.
लोणी काळभोर – हवेली तालुक्याच्या पूर्व भागात आज चार रुग्ण करोनाबाधित आढळले. लोणी काळभोर येथे दोन तर उरुळी कांचन व कोरेगाव मूळ येथे प्रत्येकी एक अशा चार नागरिकांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. लोणी काळभोर येथील 25 वर्षीय तरुणी व तिचे वडील (वय 55) या दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. उरुळी कांचन येथेही दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला