विद्युत जमवालच्या “कमांडो 3’ला मिळाली नवी रिलीज डेट

विद्युत जमवालच्या फॅन्सना आता लवकरच त्याचा आणखी एक ऍक्‍शनपॅक्‍ड सिनेमा बघायला मिळणार आहे. “कमांडो 3′ ची नवी रिलीज डेट नुकतीच जाहीर झाली आहे. आता पूर्वीपेक्षा लवकरच हा सिनेमा रिलीज होणार आहे. “कमांडो 3′ यापूर्वी 20 सप्टेंबरला रिलीज करण्याचे निश्‍चित झाले होते. मात्र आता 6 सप्टेंबरला हा सिनेमा थिएटरमध्ये झळकणार आहे. आदित्य दत्तनी डायरेक्‍शन केलेल्या या सिनेमामध्ये अदह शर्मा, अंगीरा धर आणि गुलशन देवैय्याह हे देखील असणार आहेत.

“कमांडो 3’मध्ये विद्युत जमवाल एक आंतरराष्ट्रीय हेर म्हणून दिसणार आहे. काळ्या पैशाच्या रॅकेटचा शोध घेत तो भारतातून बॅंकॉकपर्यंत पाठपुरावा करतो. दरम्यान विद्युतचा “जंगली’ नुकताच येऊन गेला. ‘द स्कॉर्पियोन किंग’ आणि “द मास्क’चे डायरेक्‍शन करणाऱ्या चक रसेल या हॉलिवूडच्या डायरेक्‍टरने केलेल्या या सिनेमावर पूर्णपणे हॉलिवूडची छाप होती. टारझनची आठवण यावी, अशी विद्युत जमवालची हत्तीवर उबे राहण्याची स्टाईल प्रेक्षकांना आठवत असेल. त्यातील ऍक्‍शनचा मसाला सोडला तर विद्युतच्या वाट्याला बाकी ऍक्‍टिंगला स्कोप नव्हता. आता “कमांडो 3’मध्ये तसे नसावे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.