मुंबई : झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि अभिनेता श्रेयस तळपदे यांच्या जोडीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. याशिवाय अभिनेत्री काजल काटे हिला देखील या मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली. नुकतेच काजलने स्वत:चे घर खरेदी केले आहे. याचा एक व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
काजलने नवीन घरात पती प्रतिक कदमसह वास्तूशांतीची पूजा केली. तिने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये घराची झलक देखील पाहायला मिळत आहे. व्हिडीओ शेअर करत “घर…सुख कळले…प्रतिक काजल करुणा” असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडीओला तिने सुख कळले हे गाणंही दिलं आहे. काजलच्या या व्हिडीओवर प्रार्थना बेहेरेने कमेंट केली आहे. “अभिनंदन…तुला प्रेम आणि सुख मिळो.” नवीन घर खरेदी केल्यामुळे तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सध्या काजल ‘मुरांबा’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
https://www.instagram.com/reel/Ctbk8ZBpahs/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
काजलचा पती मुंबई इंडियन्सच्या संघाच्या टीमचा प्रशिक्षक
काजलचा पती प्रतिक कदम आयपीएलमधील मुंबई इंडियन्सच्या संघाच्या टीममध्ये प्रशिक्षक म्हणून काम पाहात आहे. यंदाच्या आयपीएलच्या सीझनमध्ये काजल अनेकदा मुंबई इंडियन्सला सपोर्ट करतानाही दिसली होती. सामन्या दरम्यानचे काही फोटो तिने सोशल मीडियावर देखील शेअर केले होते.