मुंबई – एंटरटेनमेंट क्वीन राखी सावंतला पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे. आदिलसोबतच्या तिच्या ब्रेकअपच्या चर्चा गेल्या काही महिन्यात सोशल मीडियावर चांगल्याच रंगल्या होत्या. अशात राखी गेल्या अनेक दिवसांपासून दुबईत होती, जिथे ती तिची अकादमी चालवत आहे. नुकतीच ती भारतात परतली आहे. आणि तिने नाव न घेता सांगितले की, तिच्या आयुष्यात आता नव्या बॉयफ्रेंडची एन्ट्री झाली आहे.
लवकरच ती त्याला सर्वांसमोर आणेल. असेही ती म्हणाली आहे. आता राखीचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती एका व्यक्तीशी व्हिडिओ कॉलवर बोलत आहे आणि त्याचे गिफ्ट उघडत आहे. राखीला तिच्या बॉयफ्रेंडने हँडबॅग गिफ्ट केली आहे. हे खूप खास आहे कारण त्यात राखीच्या आईचा फोटो सुद्धा प्रिंट आहे. राखी हे गिफ्ट पाहून भावूक झाली असल्याचे व्हिडिओतून स्पष्टपणे दिसून येते.
राखीचा नुकताच आता एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये राखी म्हणत आहे की, मी दुबईमध्ये एक हॉटेल आणि एक क्लब सुरू केला आहे. मी एकटी काय काय करू मला एका जीवनसाथीची खूप जास्त गरज आहे. मला दुबईमध्ये एक खास व्यक्ती भेटलाय. माझा आदिल दुर्रानी याच्यासोबत घटस्फोट घेणे बाकी आहे. माझे आता दुबई बरोबर एक खास नाते तयार झाले आहे. असे ती म्हणत आहे. यावरुन आता अशा चर्चा आहेत की राखीच्या आयुष्यात आता नव्या सोबती आला आहे.
काही महिन्यापूर्वी राखी सावंतने धर्म बदलून आदिल दुर्रानी नावाच्या व्यक्तीशी लग्न केले होते, पण काही दिवसातच राखीची आदिलने फसवणूक केली. आदिल सध्या तुरुंगात असून राखी लवकरच त्याला घटस्फोट देणार आहे.