करोनाच्या धास्तीने व्यापरी, ग्राहकांनी फिरवली पाठ
चिंबळी – करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अडीच महिन्यांपासून मरकळ (ता. खेड) येथे दर मंगळवारी भरणारा आठवडे बाजार बंद होता. हा बाजार मंगळवारी (दि. 9) पुन्हा सुरू झाला मात्र, करोनाच्या धास्तीने तुरकळ व्यापारी आणि ग्राहक सोडले तर बाजारात शुकशुकाटच होता.
गेल्या अडीच महिन्यांपासून बाजार, हॉटेल आदी ठिकाणी बंद असल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले. तर आठवडे बाजारही बंद असल्याने ग्रामपंचायतील कर रूपातून मिळणारा पैसा बंद झाल्याने ग्रामपंचायतीलाही फटका बसला आहे. दरम्यान, मरकळ येथे आज सर्व शासकीय नियमांचे पालन करून बाजार भरवण्यात आला होता. यावेळी बाजारात गर्दीतर होत नाही ना, सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत आहे की नाही, व्यापरी व ग्रामास्थांनी तोंडाला मास्क लावले आहे की आदीबाबत ग्रामपंचायतीद्वारे खबरदारी घेण्यात येत होती.