मुंबई – केंद्र सरकारने सोमवारी धडक पाऊल उचलत चिनी अॅप्समध्ये टिकटॉकसोबतच शेअर इट, हॅलो, यूसी ब्राऊजर, लाइकी आणि व्ही-चॅट या अॅप्सवर बंदी घातली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. “तिथं मॅप बदललेत आपण अॅपवर बंदी घालतोय; काय पोरकटपणा आहे,” असे म्हणत आव्हाड यांनी सरकावर टीका केली.
तिथे मॅप बदलले जात आहेत, आणि आपण इथे ॲप वर बंदी घालतोय. काय पोरकटपणा आहे! कारण आपण वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे सदस्य आहोत आणि आपण स्वाक्षरी केलेल्या कराराच्या कलम २ आणि १४ (सी) – २ या कलमांनुसार ही बंदी शक्य आहे का ?
कशाला ही धूळफेक?— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 1, 2020
“तिथे मॅप बदलले जात आहेत आणि आपण इथे अॅपवर बंदी घालतोय. काय पोरकटपणा आहे! कारण आपण वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे सदस्य आहोत आणि आपण स्वाक्षरी केलेल्या कराराच्या कलम २ आणि १४ (सी) – २ या कलमांनुसार ही बंदी शक्य आहे का? कशाला ही धूळफेक?,” असा सवाल आव्हाड यांनी केला आहे. त्यांनी ट्विटरवरून सरकारवर निशाणा साधला.