गुवाहाटी – आसामातील नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्स म्हणजेच एनआरसी अंतिम यादी आज सकाळी प्रसिद्ध झाली आहे. या यादीत ३ कोटी ११ लाख २१ हजार नागरिकांना स्थान मिळाले आहे. तर १९ लाख ६ हजार ६५७ जणांना या यादीमधून वगळण्यात आले आहे.
Prateek Hajela,State Coordinator,NRC: A total of 3,11,21,004 persons found eligible for inclusion in final NRC leaving out 19,06,657 persons including those who did not submit their claims.Those not satisfied with outcome can file appeal before Foreigners Tribunals. (file pic) https://t.co/HfgIsjZ6lr pic.twitter.com/A73ATaijTC
— ANI (@ANI) August 31, 2019
दरम्यान, जे या देशाचे नागरीक असल्याचा सबळ पुरावा देऊ शकले नाहीत अशा लोकांची नावे या रजिस्टर मधून वगळण्यात आली आहेत. तसेच एनआरसीच्या अंतिम यादीनंतरही ज्यांचे समाधान झाले नसेल, अशा व्यक्ती फॉरिनर ट्रीब्युनलसमोर आपले अपील दाखल करू शकतील. तर अंतिम यादी प्रसिद्ध केल्यानंतर आसाममध्ये सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.