बेळगाव – कर्नाटकाची राजधानी बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली. काही समाजकंटकांनी गुरुवारी रात्री महाराजांच्या मूर्तीवर काळा रंग ओतल्याने संतापाची लाट उसळली आहे.या घटनेचा निषेध करण्यासाठी बेळगावमध्ये रास्ता रोको करत मराठी भाषिक आक्रमक झाले आहेत.
“ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ನಡೆದ ಪುಂಡಾಟಿಕೆ ಖಂಡನೀಯ. ಕಾನೂನು ಸುವ್ಯವಸ್ಥೆಗೆ ಧಕ್ಕೆ ತಂದರೆ ಕಠಿಣ ಕ್ರಮ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಲು ಗೃಹಸಚಿವರಿಗೆ ಸೂಚನೆ ನೀಡಲಾಗಿದ್ದು, ಹಲವರ ಬಂಧನವೂ ಆಗಿದೆ. ಕಲ್ಲು ತೂರಾಟ, ಸಾರ್ವಜನಿಕ ಆಸ್ತಿಗೆ ಹಾನಿ ಮಾಡುವುದು ಕಾನೂನುಬಾಹಿರ. ಇಂತಹ ಘಟನೆ ನಡೆಯದಂತೆ ದೀರ್ಘಾವಧಿ ಕ್ರಮ ಕೈಗೊಳ್ಳಲು ಪೊಲೀಸರಿಗೆ ಸೂಚಿಸಿದ್ದೇನೆ.” (1/2)
— CM of Karnataka (@CMofKarnataka) December 18, 2021
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या निषेधार्थ शिवसेना आक्रमक झाली आहे. दुसरीकडे मात्र या घटनेवरून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेवर धक्कादायक विधान केलंय.
त्यांनी ट्विट केले आहे की,’रातोरात महाराष्ट्र एकीकरण समितीनं जे केलं, त्याचा आम्ही निषेध करतो. कुणीही कायद्याविरोधात गेलं, तर कारवाई ही होणारचं. गृहमंत्र्यांना तसे कारवाईचे आदेशही देण्यात आले आहेत. छोट्या-मोठ्या घटनेसाठी सावर्जनिक मालमत्तेचं नुकसान सहन केलं जाणार नाही.’
दरम्यान, विटंबना ही छोटी गोष्ट आहे, असं विधान बोम्मई यांनी केल्यानं आता शिवप्रेमी अधिकच संपातले आहेत. महाराष्ट्रभरातून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याविरोधात संताप व्यक्त केला जातो आहे.