नवी दिल्ली – राज्य सरकारने प्रवेशास बंदी घातलेल्या महाविद्यालयाला अनुकूल असे आदेश देण्यासाठी लाच स्वीकारल्याचा आरोप असणाऱ्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधिशांविरोधात सीबीआय आरोपपत्र दाखल करणार आहे. सोमवारी हे आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
शुक्ला यांच्याशिवाय छत्तिसगढ उच्च न्यायालयाचे न्यायाधिश आय. एम. कुद्दुसी आणि अन्य तीन व्यक्तींविरोधात हे आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. या एफआयआरमध्ये नोंदवण्यात आलेल्या आरोपांबाबत ठोस पुरावे हाती लागले असल्याचे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
या बाबत चार चार डिसेंबर 2019 ला गुन्हा नोंदवल्यानंतर 2017 मधील या प्रकरणात कुद्दुसी आणि शुक्ला या कार्यरत न्यायाधिशांना अटक केली होती. कुद्दुसी यांच्याशिवाय त्यांच्या सहकारी भावना पांडे, लखनौ येथील मेडिकल कॉलेज चालवणाऱ्या प्रसाद एज्युकेशन ट्रस्टचे मालक बी. पी. यादव आणि मिरतच्या व्यंकटेश्वरा वैद्यकीय महाविद्यालयाचे मालक सुधीर गिरी यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.