Nirmala Sitharaman On Futures And Options Trading – पराकोटीची गुंतागुंत आणि जोखीम असलेल्या ‘फ्युचर अँड ऑप्शन’मध्ये रिटेल गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करताना सावध राहण्याची गरज आहे. अशा प्रकारचे व्यवहार वाढले तर त्यामुळे रिटेल गुंतवणूकदारावर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो, असा इशारा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिला आहे.
मुंबई शेअर बाजाराने आयोजित केलेले एका कार्यक्रमात बोलताना सितारामन यांनी सांगितले की, काही दिवसापासून फ्युचर आणि ऑप्शनमध्ये रिटेल गुंतवणूकदार जास्त व्यवहार करीत असल्याचे दिसून येत आहे. हे क्षेत्र गुंतागुंतीचे आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात जोखीम असते. याचा अंदाज सर्वांनाच आहे. तरीही जर रिटेल गुंतवणूकदारांनी या क्षेत्रात पुरेशी सावधगिरी न बाळगता व्यवहार केले तर ते आर्थिक अडचणीत येऊ शकतात आणि त्यांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. शेअर बाजारावरही त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो, असे सीतारामन यांनी सुचित केले.
काही महिन्यापासून कौटुंबिक बचत विविध वित्तीय साधनांमध्ये प्रवेश करत आहे. जर ही कौटुंबिक गुंतवणूक फ्युचर अँड ऑप्शन सारख्या जोखीमीच्या साधनात गुंतवली गेली तर कौटुंबिक गुंतवणुकीवर नकारात्मक परिणाम होईल. त्यासाठी रिटेल गुंतवणूकदारांनी या क्षेत्रात गुंतवणूक करताना सावध राहण्याची गरज असल्याचे त्यांनी पुन्हा सांगितले. शेअर बाजारानी आणि बाजार नियंत्रकांनी या संदर्भात सकारात्मक वातावरण निर्मिती करण्याची गरज आहे. भारतीय शेअर बाजाराची वाढ निकोप होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
90 टक्के लोकांना तोटा –
फ्युचर अँड ऑप्शनमध्ये गुंतवणूक करणार्या रिटेल गुंतवणूकदारांचा अभ्यास बाजार नियंत्रक सेबीने केला आहे. त्यानुसार दहापैकी नऊ गुंतवणूकदारांना या क्षेत्रात तोटा होत असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात सेबीने हा अहवाल जाहीर जाहीर केल्यानंतर सेबीच्या अधिकार्यांनीही रिटेल गुंतवणूकदारांना या क्षेत्रात गुंतवणूक करताना काळजी घ्या असा सल्ला दिलेला आहे. मात्र त्याचा फारसा सकारात्मक परिणाम झालेला नाही.