तात्यांच्या ढाब्यावर श्रावणथाळीचा आनंद

श्रावण सरींचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी, “तात्यांच्या ढाब्या’मध्ये खास श्रावणथाळी सुरू करण्यात आली आहे. रोजच्या श्रावणातील घरच्या भाज्या खाणाऱ्यांना चवीमध्ये बदल म्हणून मिळावा म्हणून कुटुंबासह गर्दी होत आहे. विविध थाळ्या सादर करण्यात प्रसिद्ध असणाऱ्या औंध-बाणेर रस्त्यावरील “तात्यांच्या ढाब्या’मध्ये आणि चाकण-खेड रस्त्यावर वाकी येथील तात्यांचा ढाबा शाखेमध्ये खास श्रावणानिमित्त श्रावणथाळी सुरू करण्यात आली आहे. या थाळीमध्ये आळू वडी, कोथिंबीर वडी, भजी, पापड, ठेचा अशा चमचमीत पण आरोग्यदायी पदार्थांबरोबरच, गावरान तुपातील चपाती किंवा भाकरीचा, बेसन आणि मटकीबरोबर आस्वाद घेता येतो. अर्थातच इंद्रायणी भाताबरोबर डाल फ्राय आणि जेवण गोड करण्यासाठी श्रीखंड असल्याने, खवय्यांची कुटुंबाबरोबर गर्दी होत आहे.

“तात्यांचा ढाबा’चे संचालक सचिन वाळके म्हणाले, की अस्सल मसाले आणि वेगळ्या चवीसाठी “तात्यांचा ढाबा’ प्रसिद्ध आहे. तात्यांच्या ढाब्या ने शाकाहारी थाळी सुरू करावी, अशी अनेकांनी मागणी केली होती. त्यामुळे खास लोकग्रहास्तव आम्ही शुद्ध आणि सात्विक अशी “श्रावण थाळी’ सुरू केली आहे, ती खवय्यांच्या पसंतीस उतरली आहे. आमच्याकडचे वातावरण, सेवा उत्कृष्ट असल्याने लोक कुटुंबाबरोबर येत आहेत. तसेच आमचे मसाले आणि पदार्थ तयार करण्याची पद्धत वेगळी असल्याने, ही चव अनेकांना आवडत आहे. या थाळीबरोबरच तात्यांच्या ढाब्याच्या सरपंच, कारभारी, पाटील आणि सावकार थाळ्याही उपलब्ध असल्याचे वाळके यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.