जनतेचे राज्य पुन्हा महाराष्ट्रात आले पाहिजे : पवार

पारनेर – शिवाजी महाराजांचे जनतेचे राज्य पुन्हा महाराष्ट्रात आले पाहिजे. त्यासाठी शिवस्वराज्य यात्रा आहे, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने राज्यात शिवस्वराज्य यात्रेस जुन्नर पासून सुरुवात झाली. ही यात्रा मंगळवारी (दि. 6) संध्याकाळी सहा वाजता पारनेर तालुक्‍यातील निघोज येथे आली. तेथून नगर-पारनेर मतदारसंघात या जनसंवाद यात्रेस प्रारंभ झाला.

व्यासपीठावर विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, रा. कॉं.चे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, आमदार विद्याताई चव्हाण, अविनाश आदिक, घनश्‍याम शेलार, प्रदेश उपाध्यक्ष दादाभाऊ कळमकर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, जि. प.चे माजी सभापती मधुकर उचाळे, पं. स.चे उपसभापती दीपक पवार, तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, नेते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नीलेश लंके उपस्थित होते. पवार म्हणाले, पाच वर्षांत शेतकऱ्यांना काय दिले.

राज्यात युतीचे सरकार असून, येथील आमदारांनी काय कामे केले, हे विचारा. पारनेरमध्ये अनेक जण इच्छुक आहेत. पण तुमच्या मनातला उमेदवार मी देण्याचा प्रयत्न करीन. मुंडे म्हणाले, शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारे रयतेचे राज्य यावे, यासाठी ही शिवस्वराज यात्रा आहे. युवक अध्यक्ष विक्रमसिंग कळमकर, सुरेश धुरपते, सुदाम पवार, संभाजी रोहकले, किसनराव रासकर, इंद्रभान गाडेकर, बापू शिर्के, सखाराम आढाव, सरपंच अरुणाताई खाडे, सुवर्णा धाडगे, राहुल झावरे, आनंदराव सालके, अनिल गंधाक्ते, विजय औटी, संदीप मगर, दादा शिंदे, श्रीकांत चौरे, सतीश भालेकर उपस्थित होते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.