कष्टाने होरपळलेल्या जीवनात बलिदानाचा आनंद ?

नवी दिल्ली: एका बाजूला प्रदूषणाची झळ मुलांना बसू नये म्हणून शाळांना सुटी देण्यात आली आहे. त्याच वेळी पोटाची टीचभर खळगी भरण्यासाठी प्रदूषणाचे आगर असणाऱ्या चौका चौकात ट्राफिक सिग्नलला उभारून खेळणी विकण्याचे कष्टप्रत जीवन बालदिनीही त्यांच्या ललाटी लिहले होते. मुलांची निरागसता भावात असल्यामुळेच पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म दिवस बाळ दिन म्हणून साजरा केला जातो. एका बाजूला बालकांच्या न्याय हक्काबद्दल चर्चा होत असताना दुसऱ्या बाजूला अशा कष्टकरी चिमुरड्यांकडे होणारे समाजाचे दुर्लक्ष वेदनादायी आहे.

दिल्लीतील प्रदूषणाची पातळी प्रचंड वाढल्याने आरोग्य आणीबाणी जाहीर करण्याची वेळ आली आहे. हवेतील प्रदूषण वाढल्यामुळे दिल्लीकरांना श्‍वास घेणेदेखील कठीण झाले असून, दिल्लीतल्या हवेची गुणवत्ता 500च्या वर पोहचली आहे. त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे.

प्रदूषणाने उच्चत्तम पातळी गाठल्यामुळे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ट्विटच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली आहे. सिसोदियांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, उत्तर भारतातील वाढत्या प्रदूषणामुळे परिस्थिती अत्यंत चिंताजनक झाली असून सरकारी तसेच खासगी शाळांना सुट्टी देण्य़ाचा निर्णय घेतला आहे. परंतु जी मुले शाळेतच जात नाहीत, किंवा पोटाची खळगी भरण्यासाठी रस्त्यावर काहीतरी विकून दोन पैसे कमवत आहेत त्यांचं काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here