#AFGvsWI T20 Series : वेस्टइंडिजचे अफगाणिस्तानसमोर १६५ धावांचे लक्ष्य

लखनौ : सलामीवीर एविन लुइसच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने पहिल्या टी-२० क्रिकेट सामन्यात अफगाणिस्तानसमोर २० षटकांत १६५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

वेस्टइंडिज विरूध्द अफगाणिस्तान दरम्यान तीन सामन्याच्या टी-२० क्रिकेट मालिकेतील पहिल्या सामन्यास आज लखनौमधील एकाना स्टेडियमवर सुरूवात झाली आहे. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेत वेस्टइंडिजला फलंदाजीसाठी पाचारण केले. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने २० षटकांत ५ बाद १६४ धावा केल्या अाहेत.

वेस्टइंडिजकडून सलामीवीर एविन लुइसने ४१ चेंडूत ४ चौकार व ६ षटकांरासह सर्वाधिक ६८ धावा केल्या. तर कायरन पोलार्डने २२ चेंडूत २ चौकार व १ षटकांरासह नाबाद ३२ धावा केल्या. याशिवाय शिमरन हेटमायरने २१ आणि दिनेश रामदिनने २० धावा केल्या.

अफगाणिस्तानकडून गोलंदाजीत गुल्बदीन नाएबने ४ षटकांत २४ धावा देत सर्वाधिक २ गडी बाद केले. तर नवीन उल हक, राशिद खान आणि मुजीब उर रहमान यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

Leave A Reply

Your email address will not be published.