मॉस्को – रशियाच्या अद्यक्षपदासाठी पुढील वर्षी होणार् या निवडणुकीत अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांना आव्हान देणार् या एका पत्रकार महिलेचा अर्ज निवडणूकआयोगाने स्वीकारण्यास नकार दिला आहे. येकातेरीना दंतोत्सवा असे या पत्रकार महिलेचे नाव आहे. दाखल करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये चूका असल्याचे सांगून त्यांचा अर्ज नाकारण्यात आला आहे.
येकातेरीना दतोत्सवा यांनी युक्रेनमध्ये शांतता रहावी, यासाठी रशियाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये भाग घेण्याचे ठरवले होते. रशियाचे सर्व देशांशी शांततापूर्ण आणि मैत्रीचे संबंध रहावेत आणि सर्व देशांना रशियाने सहकार्य करावे, असे आपल्याला वाटत असल्याचेही त्यांचे म्हणणे होते.
निवडणूक आयोगाने आपला अर्ज स्वीकारण्यास नकार दिल्याबद्दल खेद व्यक्त करणारी पोस्ट दंतेत्सवा यांनी टेलिग्राम ऍपवर लिहीली आहे. निवडणूक आयोगाने आपल्या अर्जामध्ये तब्बल १०० चूका काढल्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रमुखांनी दंतेत्सवा यांना समजावण्याचा प्रयत्न केला आहे. कोणतीही वजा श्रेणीची गोष्ट कधीही अधिक श्रेणीमध्ये बदलली जाऊ शकते. निराश होण्याचे कारण नाही. अजून आयुष्य बरेच शिल्लक आहे.
आपल्याला अध्यक्षीय निवडणुकीचे अधिकृत उमेदवार बनवण्यासाठी आपल्याला उमेदवारी द्यावी, असे आवाहन दंतेत्सवा यांनी काही राजकीय पक्षांना केले आहे.