नवी दिल्ली – जमीन रेकॉर्ड पेपर पडताळणीसाठी एका शेतकऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी महसुल विभागातील चार कर्मचाऱ्यांसह एकूण सहा जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधील बनसडीह पोलीस स्टेशन हद्दीतील करमार गावातील रहिवासी राजेश सिंह (शेतकरी) हे शुक्रवारी दुपारी बांसडीह तहसील येथे महसुल नोंदणीची पडताळणी करण्यासाठी गेले होते. यादरम्यान लेखपाल यांच्याशी वाद झाला.त्यातून महसुल कर्मचाऱ्यांनी त्यांना मारहाण केली.
ही माहिती मिळताच त्या भागातील शेतकऱ्यांनी निदर्शने सुरू केली होती. उपविभागीय दंडाधिकारी राजेश कुमार गुप्ता यांनी लेखपालवर व संबंधीत महसुल कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
विशेष म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्यांनीही या प्रकरणी निदर्शने केली होती. राजेश सिंह यांच्या तक्रारीच्या आधारे शनिवारी रात्री आयपीसी अंतर्गत महसुल विभागातील चार लेखपाल आणि अज्ञात व्यक्तींसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.