#व्हिडीओ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन

पुणे : मोठ्या उत्साहात आणि जड अंत:करणाने दहा दिवसांच्या सार्वजनिक आणि घरगुती बाप्पांना गुरूवारी निरोप देण्यात आला. पुण्यात देखील गणपती विसर्जन मिरवणुका मोठ्या उत्साहात पार पडत होत्या. पहाटेच्या वातावरणात मोरया…मोरया..ची मन प्रसन्न करणारी ललकारी ऐकूण सर्वांना उत्साह वाढला होता.

गेले 10 दिवस आपल्या लाडक्‍या बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर गुरूवारी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषणात बाप्पाला निरोप देण्यात आला. बाप्पाच्या मिरवणुकीत कोणतेही विघ्न येऊ नये यासाठी पोलीस यंत्रणाही सज्ज होती.

Leave A Reply

Your email address will not be published.