पुणे – “गणपती बाप्पा मोरया’, “पुढच्या वर्षी लवकर या’ अशा जयघोषात मंगळवारी गणरायाला निरोप देण्यात येणार आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये विराजमान झालेल्या गणरायाला अनंत चतुर्दशीच्या दिवशी निरोप देण्यात येतो.
यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने विसर्जन होणार आहे. दरवर्षी “श्रीं’ना वाजतगाजत निरोप देण्यात येतो. मात्र यंदा मंडळे देखील साधेपणाने निरोप देणार आहेत. परंपरेनुसार महापौर मुरलीधर मोहोळ मंगळवारी सकाळी 10.30 वाजता कसबा गणपतीला पुष्पहार अर्पण करणार आहेत.
यानंतर मानाच्या गणपतींचे विसर्जन होणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत विसर्जन होणार असून, नागरिकांना यंदाचा सोहळा ऑनलाइन पाहता येणार आहे.
- मानाच्या आणि प्रमुख गणपतींच्या विसर्जन वेळा
- मानाचा पहिला कसबा गणपती- सकाळी 11.30
- मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती- दुपारी 12.15
- मानाचा तिसरा गुरुजी तालिम गणपती- दुपारी 1.00
- मानाचा चौथा तुळशीबाग गणपती- दुपारी 1.45
- मानाच्या पाचवा केसरीवाडा गणपती – दुपारी 2.30
- श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट गणपती- दुपारी 3.15
- श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या गणपती-सायंकाळी 6.47
- अखिल मंडई मंडळ शारदा गजानन- सायंकाळी 7.00