भाडेकरूंना मारहाण करून घर पाडले

पिंपरी (प्रतिनिधी) -कासारवाडी येथे जागामालकाच्या नातवांनी आणि त्यांच्या सुमारे 50 साथीदारांनी भाडेकरुंना घराबाहेर काढून त्यांचे सर्व सामान जबरदस्तीने नेले. तसेच त्यांचे राहते घर, दुकान जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त केले. ही घटना गुरुवारी (दि. 4) सायंकाळी साडे पाच वाजताच्या सुमारास घडली.

या प्रकरणी आशुतोष चंद्रभान यादव (वय 27, रा. शंकरवाडी, डायची कंपनीसमोर, कासारवाडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार निलेश अंकुश लांडे (वय 28), अमोल अंकुश लांडे (वय 25) दोघेही रा. कासारवाडी तसेच 25 ते 30 पुरुष आणि 15 ते 20 महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी हे भाडेतत्त्वावर राहत होते. जागेच्या मालकाचे नातू निलेश आणि अमोल लांडे आणि त्यांचे साथीदार यांनी फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करुन आणि जिवे मारण्याची धमकी देत घराबाहेर काढले. घर जेसीबीच्या साह्याने जमीनदोस्त केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.