सांगवी (वार्ताहर) – लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघ व जय भगवानबाबा महासंघ यांच्या वतीने गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
करोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून हा कार्यक्रम घेण्यात आला.या वेळी मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेश ढाकणे, कैलास सानप, वनविभागाचे अधिकारी रमेश जाधव, दत्तात्रय धोंडगे आदी उपस्थित होते.
यानिमित्त गरीब, गरजू शंभर कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. दरम्यान, गोपीनाथ मुंडे यांच्यावर भरभरून लिहिल्याविना महाराष्ट्राचा इतिहास पूर्णच होऊ शकणार नाही. ते दिल्लीच्या राजकारणात सक्रीय होते, तरी त्यांचे लक्ष महाराष्ट्राकडेच असायचे. घार फिरते आकाशी, लक्ष तिचे पिल्लापाशी’ अशी त्यांची अवस्था होती.
महाराष्ट्रात परतेन, तर मुख्यमंत्री होण्यासाठीच, असे स्वप्न उराशी बाळगून त्यांची वाटचाल सुरू होती. आज गोपीनाथ मुंडे हवे होते, अशा शब्दात पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.