Namaz Break – सध्या देशाच्या राजधानीत संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. अनेक महत्वाच्या विषयावरील विधेयक मांडली जात आहेत. यामुळे संसदेच्या कामकाजासाठी प्रत्येक मिनिट महत्वाचा असल्यामुळे राज्यसभेतील प्रत्येक शुक्रवारी नमाजसाठी मिळणारा अर्धा तासाचा ब्रेक रद्द करण्यात आला आहे.
संसद अधिवेशनादरम्यान दर शुक्रवारी (जुम्मा) नमाजसाठी मिळणारा अर्धा तासाचा ब्रेक राज्यसभेत यापुढे हाेणार नाही. लाेकसभा व राज्यसभा संसदेचे दाेन अंग आहेत. राज्यसभेप्रमाणेच लाेकसभेतही सर्व वर्ग व समुदायाचे लाेक आहेत. त्यानंतर लाेकसभेचे सत्र सामान्य दिवसाप्रमाणे शुक्रवारीदेखील दुपारी २ वाजता सुरू हाेते. दाेन्ही सभागृहात एकरूपता आणण्यासाठी राज्यसभेत हा नियम तयार करण्यात आला.
संसद अधिवेशनादरम्यान दर शुक्रवारी (जुम्मा) नमाजसाठी मिळणारा अर्धा तासाचा ब्रेक राज्यसभेत यापुढे हाेणार नाही. द्रमुकचे खासदार तिरुची शिवा यांनी वरिष्ठ सभागृहात हा मुद्दा मांडला हाेता. त्यावर सभापती व उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले, यासंबंधीच्या नियमांतील बदल एका वर्षापूर्वी करण्यात आला आहे.
राज्यसभेच्या ८ डिसेंबरच्या व्हिडिआेनुसार दुपारच्या भाेजनानंतर दुपारी २ वाजता बैठक सुरू झाली तेव्हा शिवा यांनी हा मुद्दा मांडला. ते म्हणाले, दर शुक्रवारी सभागृहातील बैठक दुपारी २.३० वाजता सुरू हाेत हाेती. म्हणजे नमाजच्या ब्रेकनंतर ही बैठक व्हायची. या वेळी मात्र बैठक दाेन वाजता सुरू करण्यात आली आहे.