WhatsApp channel 3 new features : व्हॉट्सॲपने काही काळापूर्वी भारतात चॅनल फीचर लाईव्ह केले आहे. आता कंपनी यामध्ये 3 नवीन फीचर्स देणार आहे. जर चॅनल तुमचेही असेल तर जाणून घ्या…काय फीचर्स मिळणार आहेत.
WhatsApp चे जगभरात 2 अब्जाहून अधिक सक्रिय वापरकर्ते आहेत. कंपनी वेळोवेळी अॅपमध्ये नवनवीन अपडेट्स आणत असते. काही महिन्यांपूर्वी, व्हाट्सएपने अॅपमध्ये चॅनेल हे नवीन फीचर आणले. जे लोकांना त्यांच्या आवडत्या क्रिएटर, सेलिब्रिटी आणि संस्थांशी नंबरशिवाय कनेक्ट करण्याची परवानगी देते. आता कंपनी चॅनलमध्ये काही नवीन फीचर्स जोडणार आहे. तुमचेही व्हॉट्सअॅप चॅनल असेल तर जाणून घ्या काही नवीन येत आहे का.
व्हॉट्सअॅपच्या डेवलपमेंटवर (development of WhatsApp) लक्ष ठेवणाऱ्या वेबसाइट Wabetainfo नुसार, कंपनी चॅनलसाठी 3 नवीन फीचर आणत आहे ज्यात चॅनल अलर्ट (channel alert) , नेव्हिगेशन पातळी लपवणे (Hide Navigation level) आणि तारखेनुसार संदेश शोधण्याची ( search messages by date features) सुविधा समाविष्ट आहे.
तुम्हाला चॅनलच्या उजव्या बाजूला दिसणाऱ्या तीन डॉट मेनूमध्ये ‘चॅनेल माहिती’ (Channel Info) अंतर्गत चॅनेल अलर्ट (Channel alert) आढळतील. येथे तुम्हाला अपडेट्स मिळतील जे तुम्हाला सांगतील की तुम्ही चॅनलमध्ये कंपनीच्या नियमांचे उल्लंघन केले आहे की नाही. याशिवाय, स्क्रीन खाली स्क्रोल करताना नेव्हिगेशन स्तर (Navigation level) आणि टॉप बार काढून टाकण्यासाठी कंपनी अॅपमध्ये एक फिचर जोडत आहे. याव्यतिरिक्त, तुम्हाला आता तारखेनुसार चॅनेलमधील संदेश शोधता येतील.
Phone Tips : मोबाईलवर दिसणाऱ्या जाहिरातींमुळे हैराण आहात का? 3 क्लिकमध्ये Ads करा बंद, पाहा स्टेप्स…
सध्या, हे अपडेट्स व्हॉट्सअॅपच्या बीटा व्हर्जनमध्ये उपलब्ध आहेत जे लवकरच सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध होऊ शकतात. तुम्हालाही कंपनीचे नवीनतम अपडेट्स सर्वात आधी मिळवयाचे असेल, तर तुम्ही WhatsApp बीटा प्रोग्रामसाठी नावनोंदणी (enroll) करू शकता.
स्टेटस टॅबमध्ये येत आहे ‘हे’ अपडेट…
सोशल मीडियातील दिग्गज कंपनी व्हॉट्सअॅप एका नवीन फीचरवर काम करत आहे. लवकरच स्टेटस टॅबमध्ये जेव्हा तुम्ही एखाद्याचे स्टेटस पाहाल तेव्हा तिथे तुम्हाला रिप्लाय बार दिसेल. सध्या अॅपमध्ये असे होते की, जेव्हा तुम्ही एखाद्याचे स्टेटस पाहता तेव्हा त्याला रिप्लाय देण्यासाठी तुम्हाला खाली दिसत असलेल्या रिप्लाय अॅरोवर क्लिक करावे लागते. पण लवकरच तुम्हाला रिप्लाय बारचा पर्याय बाय डिफॉल्ट मिळेल. म्हणजे तुम्हाला कुठेही क्लिक करण्याची गरज नाही. तुम्ही रिप्लाय बारमध्ये मेसेज टाइप करून त्या व्यक्तीला थेट उत्तर देऊ शकता. या अपडेटची माहिती व्हॉट्सअॅपच्या विकासावर (development of WhatsApp) लक्ष ठेवणाऱ्या Wabetainfo या वेबसाइटने शेअर केली आहे.