यशस्वी आर्थिक नियोजनासाठी प्रत्येक गुंतवणूकदारास काही महत्त्वाचे नियम शिस्तबद्ध पद्धतीने पाळावे लागतात. त्याला आपण सोनेरी नियम असे म्हणू शकतो.
आर्थिक नियोजनाचे सोनेरी नियम (भाग-१)
४) अकस्मित येणाऱ्या खर्चासाठी किमान नऊ महिन्याच्या मासिक उत्पन्नाएवढी बचत बाजूला ठेवा. अकस्मात येणारे खर्च प्रामुख्याने वैद्यकीय गरजांसाठी निर्माण होत असतात किंवा अचानक येणाऱ्या आर्थिक खर्चांमधून निर्माण होत असतात. अशा खर्चांसाठी पहिला पायरी म्हणजे तीन ते सहा महिन्यांच्या मासिक खर्चांइतपत रक्कम म्युच्युअल फंडांच्या लिक्विड फंडांमध्ये गुंतवावी. सद्य परिस्थिती लक्षात घेता ह्या अकस्मित येणाऱ्या गरजांसाठीचा हा फंड किमान नऊ महिन्यांच्या मासिक उत्पन्नाएवढा केल्यास अचानक येणारे वैद्यकीय खर्च, आर्थिक खर्च व सध्याच्या भारतीय परिस्थिती नोकरी जाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी ही रक्कम निश्चित उपयोगी पडू शकते. सध्याची तरुण पिढी सातत्याने नोकरीत बदल करत असते. अशावेळी पुढील कंपनीत नोकरी मिळेपर्यंत ही अकस्मात खर्चासाठी साठवलेली रक्कम उपयोगी पडू शकते.
५) आयुर्विमा आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या पंधरा ते वीस पट असायला हवा. जर गुंतवणूकदाराचे वय ४० पेक्षा कमी असेल तर निश्चितच आयुर्विमा वार्षिक उत्पन्नाच्या १५ ते २० पट घ्या. याचवेळी आवश्यक असणारा आरोग्य विमा देखील आपल्या कुटुंबासाठी आवश्यक आहे. आयुर्विमा घेतानाही गुंतवणूकदाराने शुद्ध विमा (टर्म प्लॅन) घ्यावा.
(विम्याचा वार्षिक हप्ता गुंतवणूदाराच्या वार्षिक उत्पन्नाच्या दहा पट व १५ पट गृहित धरला आहे. )
कौटुंबिक वैद्यकीय विमासुद्धा किमान ८ ते १० लाखांपर्यंत घेण्याचा प्रयत्न करावा. (कुटुंबाच्या एकूण संख्येनुसार विम्याचे संरक्षण कमी किंवा जास्त घ्यावा.)