पिंपरी (प्रतिनिधी) – तीनपट रक्कम देण्याच्या बहाण्याने एका तरुणाला १० लाख रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानंतर खो्टया नोटा देऊन फसवणूक केली. ही घटना ३० नोव्हेंबर रोजी रात्री ट्रान्सपोर्टनगर, निगडी येथे घडली.
आकाश सत्यवान शेटे (वय ३०, रा. आंबेगाव), सचिन एकनाथ नरवडे (वय ३७, रा. मोशी), तुषार टेके, दोन अनोळखी इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शुभम सोनावणे (वय २८, रा. चऱ्होली) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपींनी सोनावणे यांना तीनपट रक्कम देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून १० लाख रुपये घेतले. त्याबदल्यात त्यांना खोट्या नोटा देऊन त्यांचा विश्वासघात करत फसवणूक केली. पोलिसांनी आकाश शेटे आणि सचिन नरवडे यांना अटक केली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.