सत्तेत आल्यास सरकारी सेवेतील २२ लाख रिक्त पदे भरू – राहुल गांधी

नवी दिल्ली – लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सत्तेत असलेल्या आणि सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या पक्षांनी युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक घोषणा करत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. ‘न्याय’ योजनेनंतर आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सत्तेत आल्यास २०२० पर्यंत सरकारी सेवेतील २२ लाख रिक्त पदे भरण्यात येतील असे आश्वासन दिले आहे.

सध्या देशात तरुण मतदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी सगळ्याच पक्षात चढाओढ सुरु असल्याचे दिसत आहे. बेरोजगारी ही आजची सर्वात मोठी समस्या आहे. त्यामुळे बेरोजगारी कमी करण्यासाठी काँग्रेस पक्षाने सत्तेत आल्यास २०२० पर्यंत सरकारी सेवेतील सर्व २२ लाख रिक्त पदे भरण्यात येतील असे आश्वासन दिले आहे.

राहुल गांधींनी आपल्या ट्विटर खात्यावरून ही घोषणा केली असून, आज सरकारी सेवेत २२ लाख रिक्त पदे आहेत, आणि सत्तेत आल्यास ३१ मार्च २०२० पर्यंत या सर्व जागा भरू असे म्हंटले आहे.

https://twitter.com/RahulGandhi/status/1112392824530616320

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)