रामनन रामनाथन यांचे प्रतिपादन
लोणी काळभोर- देशातील अनेक विद्यापीठ आणि महाविद्यालयातील आजी- माजी विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना त्यांच्या नवसंकल्पानातून उद्योगनिर्मितीसाठी व नवीन उद्योजक घडविण्यासाठी इन्क्युबेशन सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या स्टार्टअप धोरणाच्या योजनेअंतर्गत रिनीवेबल एनर्जी, पॉलीमर्स आणि मॅग्रेटीक मटेरिअल, बायोटेक्नॉलॉजी, फार्मासीटीक्युल, फिनटेक, आर्टिफिशिअल इंटेलिजेंस, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अशा क्षेत्रातून जागतिक दर्जाचे इनक्युबेटर तयार करण्याचे ध्येय नीती आयोगाचे असल्याचे प्रतिपादन नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशनचे मिशन संचालक रामनन रामनाथन यांनी केले.
एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या अटल इक्युबेशन सेंटरच्या अटल इक्युबेशनच्या फोरमच्या उद्घानप्रसंगी ते बोलत होते. यावेळी एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश. तु. कराड, मनीष मेहता, प्रिन्सीपल प्रा. डॉ. किशोर रवांडे, डॉ. मोहित दुबे, डॉ. विनायक घैसास, प्रा. सुनीता मंगेश कराड, डॉ. विरेंद्र भोजवानी आदी उपस्थित होते.
यावेळी एमआयटी इक्युबेटर फोरमच्या नव उद्योजकांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. दरम्यान शालेय विद्यार्थ्यांना स्टार्ट अप बुट कॅम्पद्वारे नवीन्यपूर्ण कल्पनांना व्यवसायाभिमूख रुप देण्यासाठीचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले. रमनन रामनाथन म्हणाले की, आजी – माजी विद्यार्थी, प्राध्यापक आणि संशोधकांमध्ये उद्योजकता संस्कृती वाढविणे, विशिष्ट क्षेत्रे आणि डिझाइन उत्नादनांमधील विकास प्रक्रियांचा आरंभ करणे, आर्थिक, पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर एमआयटीतील इक्युबेशन सेंटरचा भर आहे. प्रा. डॉ. मंगेश. तु. कराड यांनी मार्गदर्शन केले. डॉ. मोहित दुबे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. स्नेहा वाघटकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सुराज भोयर यांनी आभार मानले.