मुंबई – ‘कोरोना विषाणू’च्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन असल्याने जवळपास साडेतीन महिन्यांपासून चित्रपटगृह बंद आहेत. त्यामुळे चित्रपटसृष्टीला सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लॉकडाऊनमुळे सर्वच कलाकार आपल्या घरात बसून आहेत. दरम्यान, इतक्यात तरी चित्रपटगृह उघडण्याची शक्यता नसल्याने अनेक मोठे चित्रपट निर्माते चित्रपट डिजिटल प्रदर्शित करण्याचा मार्ग निवडत आहेत.
The biggest Bollywood stars are bringing you the biggest news!
Mark your calendars for June 29, 4:30 PM.@akshaykumar @ajaydevgn @aliaa08 @Varun_dvn @juniorbachchan pic.twitter.com/u3YcokwcXJ— Disney+HotstarPremium (@DisneyplusHSP) June 28, 2020
याच पार्श्वभूमीवर बॉलिवूडमधील अनेक मोठे स्टार आज दुपारी 4.30 वाजता लाईव्ह येणार असून, एक मोठी घोषणा करण्याच्या तयारीत आहेत. डिज्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपीने ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे की, ‘फिल्म इंडस्ट्रीचे मोठे कलाकार आपल्या चित्रपटांना रिलीज करण्याच्या संदर्भात एक मोठी घोषणा करणार आहेत. या स्टारमध्ये अभिनेता अक्षय कुमार, अजय देवगन, अभिषेक बच्चन, आलिया भट्ट आणि वरुण धवन यांचा सहभाग असणार आहे.
Big news coming today! Tune into @DisneyplusHSVIP twitter handle today at 4:30 PM! @ajaydevgn @aliaa08 @juniorbachchan @Varun_dvn pic.twitter.com/yH4liAO9Pb
— Akshay Kumar (@akshaykumar) June 29, 2020