संयुक्‍त राष्ट्राची महासभा पहिल्यांदाच ऑनलाईन होणार

जिनिव्हा – सप्टेंबरमध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेवर देखील करोनाच्या संकटाचा परिणाम होणार आहे. या वर्षी जगभरातील नेते या महासभेला स्वतः उपस्थित न राहता, आपल्या भाषणांचे व्हिडीओ पाठवणार आहेत. संयुक्त राष्ट्राकडून या संदर्भात माहिती देण्यात आली आहे.

या वर्षी संयुक्त राष्ट्र आपले 75 वर्ष पुर्ण झाल्याचा आनंद साजरा करत आहे. मात्र अनेक देशात हवाई वाहतूक बंद असल्याने मोठ्या संख्येने अधिकारी येणे शक्‍य नाही. त्यामुळे अनेक नेत्यांनी करोना संकटामुळे संयुक्‍त राष्ट्रात येण्यास नकार दिला आहे.

संयुक्त राष्ट्रानुसार, कोणत्याही देशाचे प्रतिनिधी, नेते किंवा अन्य प्रमुख व्यक्ती आपला संदेश आधीच पाठवू शकतात. जेणेकरून, वेळापत्रकानुसार तो व्हिडीओ संदेश चालवला जाईल. यावेळी मात्र त्या देशांचे कायमस्वरूपी प्रतिनिधी उपस्थित असतील.

जगातील सर्वात मोठ्या संस्थेच्या महासभेकडे दरवर्षी सर्वांचे लक्ष असते. यात 193 देशांचे प्रतिनिधी सहभागी होत असतात. मात्र यंदा परिस्थिती वेगळी असल्याने, प्रतिनिधी व्हिडीओ संदेश पाठवणार आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.