मुंबई – हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता ‘रितेश देशमुख’ सोशल मीडियावर नेहमी अॅक्टीव्ह असतो. रितेश सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांशी संवाद देखील साधत असतो.
दरम्यान, पुन्हा एकदा रितेशने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक मन हेलावून टाकणारा व्हिडिओ शेअर केला आहे. एक आजी आपले पोट भरण्यासाठी रस्त्यावर लाठीकाठी खेळताना दिसत आहे. आपलं कौशल्य सादर करत ती पोट भरण्याचा प्रयत्न करत. रितेश देशमुखनं या वृद्ध महिलेला ‘वॉरिअर आजी’ असं म्हंटलं आहे. सध्या आजींचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
कोरोना लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कुणाचं काम बंद, कुणाचे पगार कापले, कुणाची नोकरी गेली. कित्येकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो आहे. हातावर पोट असलेल्यांचे तर हालच होत आहेत.