वाशिंग्टन: सध्या संपूर्ण जग करोनाच्या विळख्यात आहे. अमेरिकेची स्थिती तर सर्वाधिक गंभीर आहे. एकीकडे करोना तर दुसरीकडे कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लाइड याच्या मृत्यूनंतरचे आंदोलन. आता समस्या अशी निर्माण झाली आहे की, याच वर्षी नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कंबर कसली आहे.
मात्र जनता त्यांच्यावर नाखूश असल्याचे दिसते आहे. फ्लाइड याच्या मृत्यूनंतर ट्रम्प यांच्यावर अनेक आरोपप्रत्यारोप सुरू आहेत. अशा वातावरणात निवडणूक रॅली याच महिन्यात सुरू होणार आहे. मात्र, ट्रम्प यांनी निवडणूक रॅलीची तारीख बदलली आहे.
अमेरिकेत 19 जूनला “जूनटींथ हॉलिडे’ साजरा करण्यात येणार आहे. या दिवसाच्या सन्मानासाठी त्यांनी ही तारीख, बदलली आहे. आता निवडणूक रॅली 20 जूनला सुरू होणार आहे.