मुंबई- ‘तुलसीदास ज्युनियर’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. दिवंगत अभिनेते राजीव कपूर या चित्रपटात दिसणार आहेत. यात त्याच्यासोबत संजय दत्त आणि बालकलाकार वरुण बुद्धदेव यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
तुलसीदास ४ मार्चला प्रदर्शित होणार आहे. राजीव या चित्रपटात स्नूकर खेळाडूच्या भूमिकेत आहे. तुलसी दासचे दिग्दर्शन मृदुल यांनी केले आहे. त्याची निर्मिती टी-सीरीज आणि आशुतोष गोवारीकर यांनी केली आहे.
हा चित्रपट एका 13 वर्षांच्या मुलाच्या आयुष्याभोवती फिरतो, जो स्नूकरच्या खेळात आपल्या वडिलांच्या पराभवाचा बदला घेतो. दिग्गज कलाकारांच्या पाठिंब्याने, या स्पोर्ट्स ड्रामा चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार आणि आशुतोष गोवारीकर यांसारख्या गतिमान निर्मात्यांनी संयुक्तपणे केली आहे.
गुलशन कुमार आणि टी-सिरीज प्रस्तुत आशुतोष गोवारीकर प्रॉडक्शनचे तुलसीदास जूनियर. भूषण कुमार, कृष्ण कुमार, आशुतोष गोवारीकर आणि सुनीता गोवारीकर निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन मृदुल यांनी केले आहे.