Janhvi-Khushi Kapoor – दिवाळी निमित्त नुकतंच १० नोव्हेंबर रोजी बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरच्या (Karan Johar) धर्मा ऑफिसमध्ये धनतेरस पूजा करण्यात आली. या पूजेमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण धवन, विक्की कौशल, अनन्या पांडेसह बॉलीवूडचे अनेक सेलेब्स सहभागी झाले होते.
मात्र, यावेळी जान्हवी आणि खुशी कपूरने (Janhvi-Khushi Kapoor) विशेष लक्ष वेधलं होत. धनतेरस पूजेसाठी या दोन्ही बहिणींनी खास पद्धतीचा आऊटफिट परिधान केला होता. जान्हवी आणि खुशी कपूरने (Janhvi-Khushi Kapoor) ट्रॅडिशनल लूकमध्ये हजेरी लावली होती.
View this post on Instagram
जान्हवीने आपली लव्हेंडर रंगाची साडी रिपीट केली आहे. तर, दुसरीकडे खुशी कपूरने लाल रंगाची साडी परिधान केली होती. यावेळी या दोघी खूपच सुंदर दिसत होत्या. स्वतः खुशी कपूर आणि जान्हवीने त्यांच्या इंस्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहे.
तसेच सर्वांना दिवाळीच्या खास शुभेच्छा देखील दिल्या आहेत. चाहत्यांना सुद्धा या दोन बहिणींचा (Janhvi-Khushi Kapoor) हा खास आऊटफिट आवडला असून, या फोटोंवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव होताना दिसत आहेत.