Bollywood Movie : सिनेरसिकांसाठी यंदाची दिवाळी (Diwali) अतिशय खास असणार आहे. यंदा ऐन दिवाळीत मराठी आणि हिंदी भाषेतील वेगवेगळ्या जॉनरचे, धाटणीचे, विविध विषयांवर भाष्य करणारे काही खास चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे यंदाची दिवाळी सिनेरसिकांसाठी अतिशय आनंदाची असणार आहे.
दिवाळीत बॉक्स ऑफिसवर बिग बजेट सिनेमांची टक्कर होणार आहे. यामध्ये बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा (Salman Khan) ‘टायगर 3’ (Tiger 3) हा सिनेमाही असणार आहे. तर, दुसरीकडे मराठी मधील ‘श्यामची आई’ (Shyamchi Aai), ‘नाळ 2’ (Naal 2) आणि ‘झिम्मा 2’ (Jhimma 2) हे चित्रपट देखील समोर असणार आहेत.
सलमान खानचा ‘टायगर 3’ हा सिनेमा 12 नोव्हेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. तर, नागराज मंजुळेंच्या ‘नाळ 2′ 10 नोव्हेंबर 2023 आणि झिम्मा 2’ 24 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
त्यामुळे प्रेक्षकांसाठी ही मनोरंजनाची मेजवानी असणार आहे. तसेच, डिजिटल प्लॅटफॉर्मवर देखील काही खास सिरीज प्रदर्शित होणार असून, त्यांचे ट्रेलर देखील सोशल मीडियावर आउट झाले आहेत.