Ram Charan : दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता राम चरण (Ram Charan) आणि त्याची पत्नी उपासना (Upasana Kamineni) सध्या मुंबईत आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेत्यानं पत्नी आणि मुलीसोबत मुंबईमधील महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेतलं होत. मंदिरातील राम, उपासना आणि कालिन यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
दरम्यान, आज राम चरण आणि त्याची पत्नी उपासना यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली आहे. यावेळी शिंदे कुटुंबीयांनी राम आणि उपासना यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले.
View this post on Instagram
राम चरण आणि उपासना यांचे स्वागत करण्यासाठी एकनाथ शिंदे यांचे पूत्र श्रीकांतही उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे यांची सून वृषाली यांनी हळदी कुंकू लावून उपासना यांचं स्वागत केले.
राम चरणनं एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, “आदरणीय मुख्यमंत्री गुरू, श्रीकांत शिंदे गुरू आणि महाराष्ट्रातील चैतन्यशील लोकांनो, तुमच्या आदरातिथ्याबद्दल आम्ही मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो.” असं अभिनेता म्हणाला आहे.
उपासना यांनी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. राम आणि उपासना यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा केली असल्याचं बोललं जात आहे.