आज होणार बिचुकलेची ‘बिग बॉस’च्या घरात एण्ट्री

मुंबई- बिग बॉस-2 मराठीमध्ये दर आठवड्याला काही ना काही घडताना पहायला मिळत आहे. त्यातच स्पर्धकांचे घरात ये-जा हे तर या सीझनचे खास वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. कारण आता या घरात पुन्हा एकदा आणखी एका स्पर्धकाची एन्ट्री होणार आहे. चेक बाऊन्स प्रकरणी अटक करण्यात आलेले साताऱ्याचे ‘अभिजित बिचुकलेंचा’ आज घरात पुन्हा प्रवेश होणार आहे.

दरम्यान, 28 जुलै रोजी बिचुकले बिग बॉसच्या घरात पोहोचले आणि त्यांची ही एण्ट्री प्रेक्षकांना आजच्या (29 जुलै) एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. सातारा पोलिसांनी बिचुकलेंना चेक बाऊन्स प्रकरणी बिग बॉसच्या घरातूनच अटक केली होती. मात्र, आता बिचुकलेंच्या एण्ट्री नंतर बिग बॉसच्या घरात कोणकोणते नवनवीन बदल होणार आहेत हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.