पिंपरी – सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात गुरूवारी (दि. 25) करोनाने म्हाळुंगे (जि. पुणे) येथील 67 वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू झाला. तर, नव्याने 4 करोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे.
वृद्ध रुग्णास 16 तारखेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्या घशातील स्वॅबची चाचणी घेतल्यानंतर 17 तारखेला त्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. उपचारा दरम्यान गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला. करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेले 4 रुग्ण हे भोर, पिंपरीगाव आणि जुनी सांगवी परिसरातील आहेत. त्यामध्ये दोन ज्येष्ठ, 13 वर्षीय मुलगी आणि एक पुरुष रुग्णाचा समावेश आहे. रुग्णालयात सध्या 23 जणांवर उपचार सुरू आहे. त्यातील 11 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णालयातून आत्तापर्यंत बरे झालेल्या 786 जणांना घरी सोडण्यात आले आहे.