शिक्रापूर- महिलांनी सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने कर्तृत्व सिद्ध केलेले असल्याने महिला या अबला नसून सबला आहेत हे त्यांनी सिद्ध करून दाखविले असल्याचे प्रतिपादन माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांनी केले.
विठ्ठलवाडी येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा व भारत सरकारतर्फे नोटरीपदी नियुक्ती झाल्याबद्दल ऍड. संतोष गवारे यांचा नागरी सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ऍड. संतोष गवारे यांचा माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या हस्ते जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. ऍड. संतोष गवारे यांनी अपंग व दिव्यांगांना एक वर्ष मोफत नोटरी करून देणार असल्याचे जाहीर केले. ह.भ.प. सुमंतबापू हंबीर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक संभाजी गवारे, ऍड. राजेंद्र उमाप, किसन गवारे, लोभाजी आल्हाट, रामराव दौंडकर यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी शिरूर बाजार समितीचे माजी संचालक राहुल गवारे, पुणे बाजार समितीचे संचालक बाळासाहेब चव्हाण, सरपंच ललिता गाडे, उपसरपंच तानाजी मारणे, राजाभाऊ शिंदे, रोहित खैरे, काळुराम गवारे, हिरामण गवारे, संदीप गवारे, रायचंद शिंदे, सुभाष जगताप, जयेश शिंदे यांसह आदी मान्यवर उपस्थित होते. बाबाजी गवारे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन रघुनंदन गवारे यांनी केले. दिलीप गवारे यांनी आभार मानले.