भोर- अर्थसंकल्पीय अधिवेशनात भोर विधानसभा मतदार संघातील भोर, वेल्हा आणि मुळशी तालुक्यातील राज्य व जिल्हा मार्गांच्या रस्ते व मोठे पुलांच्या उभारणीसाठी 60 कोटी 60 लाख रुपये खर्चाच्या कामांसाठी निधीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती आमदार तथा तालुका अध्यक्ष संग्राम थोपटे यांनी दिली आहे.
भोर विधानसभा मतदार संघ हा संपूर्ण राज्यात सर्वात मोठा आणि अतिदुर्गम डोंगरी मतदार संघ आहे. या तीनही तालुक्यातील मार्गांवर वाहतुकीचे प्रमाण मोठे आहे. रस्त्यांची गरज पाहता व नागरिकांच्या मागणीनुसार आणि त्यांची रस्त्याअभावी होणारी गैरसोय टाळण्यासाठी सरकारी दरबारी दिलेल्या प्रस्तावांस अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजुरी हा निधी मंजूर करण्यात आला असल्याचे आमदार थोपटे यांनी सांगितले.