जेरूसलेम : इस्रायलच्या संशोधकांनी कोरोना विषाणूंवर लस शोधण्यात यश मिळवले आहे. यायबाबतची अधिकृत घोषणा येत्या काही दिवसांत होण्याची शक्यता आहे, असे वृत्त इस्रायलचे प्रमुख वृत्तपत्र हारेत्झने दिले आहे.
इस्रायल इन्स्टिट्यूट ऑफ बॉयॉलॉजिकल रिसर्चच्या संशोधकांनी या विषाणूची जैवशास्त्रीय संरचना आणि दर्जाबाबत अलीकडेच लक्षणीय यश मिळालेले आहे. त्यामध्ये चाचणीची क्षमता, संसर्ग झालेल्यांमध्ये प्रतिजैविकांचे उत्पादन, आणि लशीचा विकास यांचा समावेश आहे. मात्र, ही लस वापरण्यास सुरक्षित व परिणामकारक आहे, हे पहण्यासाठी काही महिने चाचणी आणि प्रयोगांची मालिका करावी लागेल, असे या वृत्तात म्हटले आहे.
या विषाणूंवर औषध शोधण्यासाठी जगभरात नावाजलेल्या या लॅबमध्ये 50 नामवंत संशोधक कार्यरत होते. या बायोलॉजी संस्थेत जगातील सर्वोच्च दर्जाची यंत्रणा आहे, असे या वृत्तात म्हटले आहे.