पिंपरी – वल्लभनगर आगारातून शिवाजीनगरकडे जात असलेल्या एसटी बसचे फुगेवाडी येथे वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस डिव्हायडरवर आदळून शिवशाही बसचे चाक निखळले. या अपघातात बसचा पत्रा फाटला असून सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.
या आगारातून मिळालेल्या माहितीनुसार, ही बस वल्लभनगर आगारातील होती. ती शिवाजीनगर आगाराकडे जात होती. शिवशाही बस पूर्ण रिकामी होती. फुगेवाडी येथे आली असता वाहनचालकाचा तोल सुटला. त्यामुळे शिवशाही बस डिव्हायडरला धडकली. त्यात शिवशाही बसचे चाक निखळले तसेच पत्राही फाटला.
त्यात शिवशाही बसचे सुमारे 25 हजार रुपायंचे नुकसान झाले. शिवशाही बसमध्ये प्रवासी नव्हते. शिवाजीनगर आगारातून आरक्षण होते व तेथून ही बस पुढे जाणार होती. मात्र, फुगेवाडी येथेच एसटी बसला किरकोळ अपघात झाला, असे आगार व्यवस्थापक संजय वाळवे यांनी सांगितले.