डॉक्टरांनी एकट्याने घेतली वॅक्सीन, पत्नीने केले असे काही कि व्हिडीओ झाला व्हायरल

नवी दिल्ली – देशभरात करोना प्रतिबंधक लसीकरणास सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर्सला प्राधान्य देण्यात येते आहे. यानुसार प्रसिद्ध डॉक्टर आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष केके अग्रवाल यांनी पत्नी विना करोना वॅक्सीन घेतली. आणि त्यानंतर डॉक्टर के के अग्रवाल लाईव्ह आले. याचवेळी त्यांच्या पत्नीचा फोन आला. आणि पत्नी जे काही म्हणाली ते लाइव्ह सेशनमध्ये रेकॉर्ड झाले. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

डॉक्टर अग्रवाल लाइव्ह सेशनमध्ये असताना त्यांच्या पत्नीचा फोन येतो आणि त्या विचारतात की, तुम्ही वॅक्सीन घ्यायला गेले होते का? यावर डॉक्टर सांगतात की, मी माहिती घ्यायला गेलो होतो, तर त्यांनी सांगितले आता कुणी नाही तर घ्या. म्हणून मी वॅक्सीन घेतली. हे ऐकून त्यांच्या पत्नीचा पारा चढला. त्या म्हणाल्या कि,  माझ्याशी खोटे बोलू नका. तुम्ही आम्हाला सोबत का नाही नेले, असे वारंवार सातत्याने विचारत होत्या. 

आपण लाईव्ह सेशमध्ये असल्याचे डॉक्टरांना लक्षात येताच ते म्हणाले, मी लाइव्ह आहे. नंतर बोलतो. यावर त्यांची पत्नी उत्तर देते की, ‘मी आताच लाइव्ह येऊन तुमची ऐशीतैशी करते’. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर डॉक्टर केके अग्रवाल यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली आहे. हा व्हिडीओ खूप पाहिला जातोय. पत्नी त्यांच्या आरोग्याबाबत आणि सुरक्षेबाबत चिंतेत आहेत. तसेच, मला आनंद आहे की, या कठीण काळात मी लोकांना हसवू शकलो, असे त्यांनी म्हंटले आहे. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.