अकोला – विदर्भातील अकोल्यातील मंदिराचा फोटो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे, अकोल्यातील हे मंदिर महादेवाचे असून, मंदिरात पिंडीला अचानक डोळे दिसत असल्याची चर्चा सुरु झाली. यामुळे या मंदिरात अनेक शिव भक्तांची गर्दी झाली आहे.
मात्र या दाव्याला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने खोटा असल्याचे म्हटलं आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष शरद वानखडे यांनी हा दावा खोटा असल्याचे सांगितले आहे. कुणीतरी जाणून-बुजून खोडसाळपणा केला असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही अंधश्रद्धेला बळी पडू नये, असा सल्लाही यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून देण्यात आला आहे.
दरम्यान, महादेवाच्या पिंडीला अचानक डोळे दिसत असल्याची बातमी समोर आल्यानंतर ही बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर मंदिरात महिलांची तोबा गर्दी झाली. काही महिलांनी श्रद्धेपोटी महादेवाने पिंडीवरील तिसरा डोळाच उघडल्याचे सांगितल्याने गर्दीत आणखीनच भर पडली.