मुंबई – ‘कॉफी विथ करण’च्या (coffee with karan 8 )आठव्या सीझनला देखील प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. नुकतेच या शोमध्ये बॉलीवूडचे स्टार कपल अभिनेता रणविर कपूर आणि अभिनेत्री दीपिका पदूकोण हिने हजेरी लावली होती. या शोमध्ये या त्यांच्या लग्नाशिवाय अनेक गोष्टींचा खुलासा केला होता. या सीझनमधील हा भाग विशेष चर्चेत आला होता. रणविर आणि दीपिकानंतर आता ‘कॉफी विथ करण’मध्ये सनी देओल (Sunny Deol) आणि बॉबी देओल (Bobby Deol) यांची एन्ट्री होणार आहे.
डिस्नी हॉटस्टार आणि करण जोहर (Karan Johar) यांनी त्यांच्या सोशल मीडियावर ‘कॉफी विथ करण 8’ नवीन प्रोमो शेअर केला आहे. यामध्ये करण जोहर, सनी देओल आणि बॉबी देओलचे स्वागत करताना दिसतो. तसेच शोला सुरुवात करण्याआधी करणने सनी देओलच्या ‘गदर 2’, बॉबी देओलच्या आश्रम आणि अॅनिमलच्या यशासाठी दोघांचे अभिनंदन केले.
The Unapologetic and the Unassuming, catch the legacy movie stars take to the couch for some scintillating conversations. #HotstarSpecials #KoffeeWithKaran Season 8 Episode 2 streams from Thursday 2nd Nov. #KWKS8OnHotstar pic.twitter.com/FQIifm7Lam
— Disney+ Hotstar (@DisneyPlusHS) October 30, 2023
यावेळी बॉबी वडील धर्मेंद्र यांच्या रॉकी वर राणी की प्रेम कहाणी चित्रपटातील किसिंग सीन विषयी देखील भाष्य केले. हा सीन चांगलाच चर्चेत आले होता. ‘कारण जोहर तुझ्या चित्रपटातील हा सीन पाहिल्यानंतर आम्ही पप्पांची खूप मस्करी केली. पण लोकांना ते खूप क्युट वाटले. ते माझे वडील आहेत. ते त्यांना हवं ते करू शकतात,’ असे सनी देओल म्हणताना दिसतो. दरम्यान, याआधी 2005 मध्ये कॉफी विथ करण या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती.