Salman Khan And Karan Johar| बॉलीवूड अभिनेता सलमान खान आणि दिग्दर्शक करण जोहर हे दोन्ही कलाकार पुन्हा एकदा एकत्र काम करणार असल्याची मागील काही दिवसांपासून चर्चा होती. ‘द बुल’ या चित्रपटाची सलमान दिसणार असून या चित्रपटाची निर्माती करण जोहर करणार आहे. मात्र आता याप्रोजेक्टमधून सलमान बाहेर पडला असल्याची माहिती समोर येत आहे.
‘द बुल’ चित्रपटाचे काम यापूर्वी नोव्हेंबर 2023 मध्ये सुरू होणार होती, परंतु ते पुढे ढकलण्यात आले. ‘कुछ कुछ होता है’मध्ये अभिनय केल्यानंतर पंचवीस वर्षांनंतर दोघे पुन्हा एकत्र येणार होते. मात्र आता ते शक्य होणार नसल्याचे म्हंटल जात आहे. Salman Khan And Karan Johar|
काय आहे यामागचं कारण?
बॉलिवूड हंगामाच्या वृत्तानुसार, करण जोहर आणि दिग्दर्शक विष्णुवर्धन अजूनही शूटिंगची योग्य डेट ठरवू शकले नाहीत. करण जोहरने सलमानला जुलैपर्यंत मुदतवाढ मागितली, त्यानंतर सलमानने साजिद नाडियादवाला आणि एआर मुरुगादास यांच्यासोबतच्या त्याच्या प्रोजेक्ट्सला प्राधान्य दिले. त्याचा प्रोजेक्ट मे महिन्यात सुरू होणार आहे. द बुल आधीच तीन वेळा पुढे ढकलण्यात आले आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा तसेच झाल्याने सलमान नाराजी व्यक्त करत यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. Salman Khan And Karan Johar|
सलमान खानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तो नुकताच ‘टायगर 3’मध्ये दिसला होता, या चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर कतरिना कैफ दिसली होती. त्यानंतर आता तो ‘किक 2’, ‘दबंग 4’ आणि ‘टायगर व्हर्सेस पठाण’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. याशिवाय मुरुगादास आणि साजिद नाडियादवाला यांच्याबरोबरच्या एका चित्रपटात तो दिसणार आहे. हा चित्रपट 2025 च्या ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे.
हेही वाचा:
“खासदार झाले तर गाव तिथे बार करणार”; महिला उमेदवाराचे अजब आश्वासन