नवी दिल्ली – आज देश 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला सलग दहाव्यांदा संबोधित करत आहेत.
#WATCH | PM Narendra Modi says, “…The Vibrant Border Villages were called the last villages of the country. We changed that mindset. They are not the last villages in the country. What you can see at the borders is the first village in my country…I am delighted that special… pic.twitter.com/Np9PC2ODDp
— ANI (@ANI) August 15, 2023
यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करत आहेत. स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाला शुभेच्छा देताना पंतप्रधान म्हणाले, “भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या सर्व शूर हृदयांना मी श्रद्धांजली अर्पण करतो.”
यादरम्यान त्यांनी मणिपूरमध्ये शांतता राखण्याचे आवाहनही केले आहे. ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ यंदाच्या स्वातंत्र्यदिनी समारोप होणार आहे. ज्याची सुरुवात पंतप्रधानांनी 12 मार्च 2021 रोजी अहमदाबाद गुजरातमधील साबरमती आश्रमातून केली होती. लाल किल्ल्यावर आज होणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील सुमारे 1,800 लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे.