भुवनेश्वर – बिजू जनता दलाचे अध्यक्ष आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी सोमवारी आपल्याच पक्षाचे एक ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री दामोदर राउत यांच्या हकालपट्टीचा आदेश मागे घेतला. पटनायक यांनी स्वाक्षरी केलेल्या कार्यालयीन आदेशात म्हटले आहे की, दामोदर राउत यांच्या हकालपट्टीचा आदेश तत्काळ प्रभावाने मागे घेण्यात आला आहे. राउत हे सात वेळचे आमदार आहेत.
पक्षविरोधी कारवायांच्या आरोपातून राऊत यांची १२ सप्टेंबर २०१८ रोजी पक्ष संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांना पक्षाचे तिकीट नाकारण्यात आले आणि त्यांचा मुलगा संबित राऊत यांनी पारादीपमधून निवडणूक लढवली आणि २०१९ मध्ये ती जागा जिंकली.
पारादीपचे आमदार संबित राऊत यांनी पत्रकारांना सांगितले की, “माझे वडील गंभीर आजारी आहेत आणि रुग्णालयात दाखल आहेत. या हकालपट्टीच्या आदेशामुळे त्यांना बरे होण्यास मदत होईल.” दामोदर राऊत नवीन पटनायक मंत्रिमंडळात 2000 ते 20018 पर्यंत चार वेळा मंत्री होते. ते 1977 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले.